Share

जळगावमध्ये तीन दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’; काय सुरु? काय बंद? घ्या जाणून

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : मागील काही दिवसांपासून कोरोना पुन्हा एकदा तोंड वर काढत असल्याचं दिसून येतंय. देशासह राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाल आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार वेळीच पावले उचलत असल्याचे दिसत आहे. तर, स्थानिक प्रशासनाकडे देखील निर्बंध लावण्यासाठी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे, तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 11 मार्च रोजी रात्री 8 पासून ते 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

काय असेल बंद ?

जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, किराणा दुकाने, नॉन-इसेन्शीयल या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, बगीचा, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत.

काय असेल सुरु ?

जनता कर्फ्यूमध्ये वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, बस, रेल्वे व विमानसेवा, नियोजीत परीक्षा असणारी शाळा व कॉलेज, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक, कोविड लसीकरण, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही पत्रकार परिषदेमार्फत सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!