पुणे – सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव (ता. माढा) या साखर कारखान्याने तब्बल 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांच्या नावे परस्पर काढल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील शेतकऱ्यांनी आज पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेवर अर्धनग्न होत भीक मांगो आंदोलन केलं.
शिंदे यांनी आपल्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव, ता. माढा या साखर कारखान्याद्वारे शेतकऱ्यांना 2013 साली खत देतो असे सांगून शेतकऱ्यांची कागदपत्रे गोळा केली. संबंधित शेतकऱ्यांना खत न देता त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन पुण्यातील कोथरुड परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचं समोर आलंय.
२०१३ पासून आतापर्यंत कारखाना वआणि बँकेची कोणतीही नोटीस कर्ज भरण्यासंदर्भात आली नाही. मात्र, २९ मेनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम २ मे पर्यंत भरावी अन्यथा, फौजदारी कारवाई करावी लागेल. असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आलाय.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर 2 ते 3 लाखाचं कर्ज आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आलीय.
दरम्यान, या शेतकऱ्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. आम्हाला न्याय द्यावा; अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी आर्त हाकही त्यांनी निवेदनात दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून नव्हे तर ‘या’ कारणासाठी झाली ‘त्या’ वृद्धाला मारहाण
- सरकारच्या अडचणी वाढणार : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी आणि धनगर समाजही आक्रमक
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आश्वासनाखेरीज सरकारने काहीही दिले नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

