Share

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात जलील यांची विजयी रॅली, तब्बल १२ टँकरच्या पाण्याची केली नासाडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या, तरी औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील आपल्या लोकसभेच्या विजयचा जल्लोष करत आहेत. हा जल्लोष साधासुधा नसून डीजे वाजवून आणि टँकरच्या पाण्याचा फवारा मारून केला जात आहे. मराठवाड्यात पाण्याची प्रचंड टंचाई असताना देखील इम्तियाज जलील आपल्या विजयी रॅलीत टँकरद्वारे पाण्याचा फवारा मारत हजारो लिटर पाण्याची नासाडी करत आहेत. त्यामुळे सामाजिक जाण नसलेला नेता म्हणून खा. इम्तियाज जलील यांच्यावर टीका होत आहेत.

लोकसभा निवडणुकीत खा. इम्तियाज जलील यांचा अभूतपूर्व विजय झाला. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात माजी खा. चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे एमआयएम कार्यकर्ते अजूनही लोकसभेच्या विजयात दंग झाले आहेत. त्यामुळे आझाद चौक ते भडकला गेट अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यावरून माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. एकीकडे संसदेत पाण्याचा प्रश्न मांडायचा आणि दुसरीकडे शहरातच पाण्याची नासाडी करायची ही इम्तियाज जलील यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

दरम्यान मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. तरी देखील खा. इम्तियाज जलील आपल्या विजयी रॅलीत पाण्याची नासाडी करत आहेत. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी निवडणुकीमध्ये पाणी पुरवठ्याचा विषय उचलून धरला होता.तसेच संसदेत ही त्यांनी शेतकरी प्रश्न आणि औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय मांडला आहे. विधानसभेत ही त्यांनी पाणी टंचाईचा विषय जोरदार मांडला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!