Share

उर्वशीच्या लुकवर खिळल्या हजारोंच्या नजरा…!

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील सुंदर आणि सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळख असलेली उर्वशी रौतेला  तिच्या फोटोशूट  तसेच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते. ती लुक्स आणि ड्रेसिंगवर विविध प्रयोग करत असताना दिसते. नुकतच तिने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

नुकतेच उर्वशीने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. उर्वशीला आंतरराष्ट्रीय आयकॉनचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला असून, या पुरस्कार वितरण समारंभात सहभाग घेतला होता. यावेळी तिचा लूक चर्चेत आला असून, त्याचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. उर्वशीला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीने घातलेल्या ड्रेसमुळे प्रकाशझोतात आली आहे. ड्रेसमुळे सर्वांच्या नजर तिच्यावर खिळल्या असून, तिला त्यावर प्रेक्षकांच्या विविध कमेंट्स येत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाचा हेव्ही एम्बेलिश्ड डिजाइनर सिल्वर हाई स्लिट कट ड्रेस घातला असून, त्यावर तिने हाई पोनी घातली आहे. तसेच व्हिडिओ पोस्ट करतांना उर्वशीने लिहिले, ‘धन्यवाद फिल्मफेयर इंटरनॅशनल आयकॉन ऑफ द इयर २०२१ अवॉर्ड.’

https://www.instagram.com/p/CVsmdO5oy78/?utm_medium=copy_link

उर्वशी लवकरच तामिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात ती माइक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आयआयटीयनची भूमिका साकारत आहे. यासोबतच ती ‘ब्लॅक रोज’ आणि ‘थिरुतु पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिचे गुरु रंधावासोबतचे ‘डूब गये’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ती रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये देखील दिसणार असून  तिच्या चाहत्यांसाठी ही चांगलीच पर्वणी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!