Share

ज्ञान व कौशल्य असणाऱ्यांना उपजीविकेची चिंता नसते-पंतप्रधान मोदी

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातेतील अहमदाबाद शहरात उभारलेल्या सरदारधाम भवनचे आज शनिवारी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी ‘सरदारधाम भवन टप्पा २’ चे भूमिपूजनही केले. या भवनाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न आहेत. सरदारधाम भवनात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.

यावेळी मोदी म्हणाले की, ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य आहे त्याला आपल्या उपजीविकेची काळजी करावी लागत नाही. सक्षम व्यक्ती आपल्या प्रगतीसाठी स्वतःचं मार्ग निर्माण करतो. देशाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भर या गोष्टीवर आहे की आपलं शिक्षण कौशल्यात वाढ करणारं असावं. भविष्यात मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या कौशल्यांना मागणी असेल, भविष्यात जगात पुढे राहायला आपल्या युवकांना काय हवं असेल, राष्ट्रीय शिक्षण धोरण हे सुरूवातीपासूनच तरुणांना जागतिक आव्हांनासाठी तयार करेल असे प्रतिपादन त्यांनी केले.

आज स्किल इंडिया मिशन हीच देशाची प्राथमिकता आहे. या मिशनअंतर्गत लाखो युवकांना वेगवेगळी कौशल्यं आत्मसात करण्याची संधी निर्माण झाली आहे. आजघडीला ते आत्मनिर्भर बनत आहेत. नॅशनल अॅपरेन्टसशीप योजनेच्या माध्यमातून युवकांना कौशल्यविकासाची संधीही मिळत आहे. त्यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे. मानवकल्याण योजनांसह इतरही अनेक योजनांच्या माध्यमांतून गुजरात या दिशेने प्रयत्न करत असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!