Share

तालिबानला समर्थन करणाऱ्या देशांना जावेद अख्तर यांचे खडेबोल

Published On: 

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनांवर देखील टीका केली होती. यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. त्यानंतर आता जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत.

जावेद अख्तर यांनी ट्विट करत तालिबानी सत्तेला पाठिंबा देणाऱ्या देशांना खडेबोल सुनावले आहे. “प्रत्येक सभ्य व्यक्ती, लोकशाही प्रधान सरकार, जगातील प्रत्येक समाजानं तालिबान्यांना मान्यता देण्यास नकार द्यायला हवा. अफगाणिस्तानातील महिलांवरील अन्यायाबाबत सर्वच देशांनी निंदा केली पाहिजे अन्यथा न्याय, माणुसकी आणि विवेक हे शब्द विसरा’, अशी कडक शब्दात अख्तरांनी आपले मत मांडले आहे.

तसेच पुढे  तालिबानी प्रवक्ता सय्यद झकीरुल्लाह यानं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत म्हंटल होत की, ‘तालिबानी प्रवक्त्यानं जगाला सांगितलं की महिला मंत्री बननण्याचा लायकीच्या नाही. त्या फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी आहेत.’ यावर देखील जावेद अख्तर यांनी भाष्य केले आहे. जावेद अख्तर म्हणाले की, ‘महिलांबाबत असं विधान करणाऱ्यांच्या सरकारला मान्यता देण्याची तयारी कथित लोकशाही प्रधान देशांनी केली आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे’, सध्या जावेद यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत असून अनेकांचे याकडे लक्ष वेधले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!