🕒 1 min read
मुंबई : सध्या शिवसेना आणि काँग्रेस राज्या स्तरावर जवळीक साधताना दिसत आहे. तसेच भाजपने यावर अनेक वेळा वक्तव्य केले. शिवसेनेने अनेक मुद्द्यावर राहुल गांधींचे समर्थन करतांना दिसले. पूर्व शिवसेना राहुल गांधीना नेहमी धारेवर धरायची अचानक त्यांना काँग्रेस आणि राहुल गांधींचा पुळका का येतोय? असा प्रश्न विरोधकांना पडला आहे. ३
यावर, भाजपने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणले, ‘तेव्हा शिव्या घालणारे आता राहुल गांधीसाठी ओव्या गातायत. कारण एकच बेशरम सत्ता पिपासा.’ असे खोचक वक्तव्य भाजपने केले आहे.
तेव्हा शिव्या घालणारे आता राहुल गांधीसाठी ओव्या गातायत….
कारण एकच बेशरम सत्ता पिपासा…@OfficeofUT @RahulGandhi @ShivSena @INCIndia @INCMaharashtra #mahanapasaghadi pic.twitter.com/T2g86aFPkh— BJP Mumbai (@BJP4Mumbai) August 11, 2021
दरम्यान, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. त्याबरोबरच त्यांनी अनेकदा राजीव गांधींना देखील लक्ष्य केले असल्याचे स्मरण अनेकांना आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेखांद्वारे काँग्रेसवर आणि राजीव गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. परंतु, काँग्रेससोबत सत्ता स्थापन करताच, शिवसेनेला या सर्वांचा विसर पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृतज्ञता…कोरोना काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देणार
- देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- भाजप आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेची रणनीती; दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश!
- आंबिल ओढा सरळ झाल्यास पुराचा धोका वाढणार; नागरिकांनी केला विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
