Share

कृतज्ञता…कोरोना काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच डॉक्टर म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शैक्षणिक फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांची आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे- पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव, जनरल सेक्रेटरी डॉ.धनराज गीते, ॲडिशनल जनरल सेक्रेटरी डॉ. अक्षय चावरे, राज्य समन्वयक डॉ. निखील कांबळे, जॉईंट सेक्रेटरी डॉ. चेतनकुमार आद्रट उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर्स रात्रंदिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांची शैक्षणिक फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत तसा प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतिगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतिगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

सेंट्रल मार्ड मार्फत शैक्षणिक फी माफी, कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुगणालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णाललयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे,वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता अशा काही मागण्या असलेले निवेदन यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांना देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!