औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कल्याण नलावडे तसेच वेरूळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य इम्रान पठाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला. येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. कसाबखेडा गावचे उपसरपंच तन्वीर पटेल, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष बागूल यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात शिवसेनेचे मेळावे सुरू आहेत. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत बंब विरुद्ध इतर सर्व पक्ष असा संघर्ष कायम राहिला आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली महाविकास आघाडी तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युवासेनेचे संतोष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघातील गणिते बदलली आहेत. आता शिवसेनेने भाजपचे कार्यकर्ते गळाला लावून पक्षाला बळकटीकरणी करण्याचे काम सुरू केले आहे. आगामी काळात मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी सांगितले.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारणात ही उलथापालथी सुरू आआहेत येणाऱ्या काळात नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून याद्वारे भाजपला धक्के देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. लासुर स्टेशन येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अंबादास दानवे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, राजू वरकड आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कालच्या घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्राकडेच होते हे सिद्ध झाले’-अरविंद सावंत
- ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव आणि बादशाहचा म्युझिक व्हिडीओ व्हायरल
- ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करा’
- ‘आजारी माणसाला गोळी दिली पण अर्धीच, तो बरा कसा होणार?’ ; शिवसेनेचा सवाल
- सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ५ तालुक्यांत १३ ऑगस्टपासून संचारबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

