🕒 1 min read
औरंगाबाद : ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी १५० एकर जागा असणे आवश्यक आहे. आपल्याकडे करोडी येथे क्रीडा विद्यापीठासाठी देण्यात आलेली जागा होती १३४ एकर. त्यामुळे ज्यांनी काही दिलंच नव्हतं ते जर आज क्रीडा विद्यापीठ गेले गेले, अशी ओरड करत असतील तर त्यांना या बाबतीत बोलण्याचा काहीही अधिकार नाही. क्रीडा विद्यापीठ एकाच ठिकाणी असावे असा कुठलाही नियम नाही. त्यामुळे शिवसेना क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेतही आणणार. याबाबत क्रीडा मंत्र्यांशीही चर्चा झाली’ असल्याचे शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.
औरंगाबादला जाहीर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले आहे. याविषयी पुढे बोलताना आ. दानवे म्हणाले, कुठलेही विद्यापीठ केवळ एकाच ठिकाणी होऊ शकते, असा कुठलाही नियम नाही. त्यामुळे क्रीडा विद्यापीठ जर पुण्यात होत असेल तरीही ते नक्कीच औरंगाबादेत सुद्धा होऊ शकते. याबाबत मी स्वतः क्रीडा मंत्र्यांशी चर्चा केली आहे. औरंगाबादवर कुठलाही अन्याय झालेला नाही. क्रीडा विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा पुण्यामध्ये आधीच उपलब्ध होत्या. मात्र याचा अर्थ असा नव्हे की औरंगाबाद मध्ये आता विद्यापीठ होणारच नाही.
शिवसेना यासाठी प्रयत्न करेल. नक्कीच औरंगाबादेत देखील दुसरे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी १५० एकर जागा असणे आवश्यक आहे. आणि ती जागा मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही चाचपणी सुरू केली आहे. अनेक संस्था ज्या औरंगाबादेत येणार होत्या, आयआयएम विद्यापीठ, आर्किटेक्चर विद्यापीठ इतरत्र पळविण्यात आले. याबाबत कुणी का बोलत नाही? क्रीडा विद्यापीठ पुन्हा एकदा मराठवाड्यात आणण्यासाठी नक्कीच शिवसेना काम करेल अशी ग्वाही आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो’; मुख्यमंत्री ठाकरेंचा नीरजच्या कुटुंबियांना फोन
- ‘पुण्याच्याबाबत काहीही ठरवताना मी मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घेतो’-अजित पवार
- ‘मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही ; भाजपचं दोन्ही बाजूने ढोलकी वाजवण्याचे काम’
- ‘पुणेकरांनो, सूट देतोय पण ७% च्या वर पुन्हा पॉझिटिव्हीटी रेट गेला तर…’; अजितदादांचा इशारा
- ‘या हलक्या मानसिकतेमुळे तुम्ही नक्की ओळखले जाताल’; ‘त्या’ ट्वीटनंतर अशोक पंडित ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
