सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजप नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली. ज्यांच्या हाती देशाची सत्ता त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्थाच नाही, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला. सत्ता लोकहितासाठी राबवायची असते. पण भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशातील जनता हे सगळं पाहतेय. ही जनताच भाजपला धडा शिकवेल, असं पवार म्हणाले. रेल्वे, विमानतळ, वाहतूक व्यवस्थेचं खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारनं घातलाय, स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी पायाभूत सुविधा उभारल्या, पण मोदी सरकारला रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्यात अधिक रस असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

