Share

‘ज्यांचे वय होतं, त्यांना मरावही लागतच’ मध्यप्रदेशच्या मंत्र्याच धक्कादायक विधान

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ: देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.

दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. यामध्ये राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. तर काही नेत्यांच्या धक्कादायक विधानांनी त्यात भर पडत आहे. असंच एक धक्कादायक विधान केले आहे मध्यप्रदेशचे पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी ‘ज्यांचं वय होतं, त्यांना मरावंही लागतंच’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

14 एप्रिल रोजी मध्यप्रदेशच्या बडवानी याठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आले असताना त्यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांसमोर अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना प्रेमपालसिंह पटेल म्हणाले की, ‘हे मृत्यू कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक जण कोरोनापासून वाचण्यासाठी सहकार्य मागत आहेत. तुम्ही म्हणता की, रोज अनेक लोक मरत आहेत. ज्यांचे वय होते, त्यांना मरावंही लागतंच’. एएनआय या वृत्तसंस्थेनं पटेल यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यामुळे जर नेतेमंडळी कोरोना मृत्युला गांभीर्याने घेत नसतील तर ही परिस्थिती आणखी बिकट होणार हे स्पष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!