पुणे : कोल्हापूरकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज पहाटे सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिराबाहेरून दर्शन घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि इतर ठिकाणी जाऊन सोमय्या हे बेनामी मालमत्तेची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील कोल्हापुरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदी करण्यात आली. तर त्यांना मुंबईतच रोखण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. कालपासून सुरु झालेल्या या घडामोडी अजूनही सुरु असून सोमय्या यांना आता पोलीस मुंबईत सोडण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडून पोलिसांना हाताशी धरून दडपशाही सुरु केल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली असून काही इशारे देखील दिले आहेत. दरम्यान,भाजप इतर पक्षातील नेत्यांवर आरोप करते आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश किंवा हातमिळवणी केली तर क्लीनचिट दिली जाते. अजित पवार यांच्याबाबत देखील अशी घटना पाहायला मिळाली. त्यांनी काही काळ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर केसेस मागे घेतल्याचे बोलले गेले होते.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘किरीट सोमय्या ब्रिलियंट आहेत, त्यांनी सुंदर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी राणेंचं उदाहरण दिलं. आम्ही कोणाला सोडलं नाही, अजित पवारांच्या सिंचनाच्या सगळ्या केस सुरु आहेत, काय कुणाला सोडलेलं नाही, तुम्ही काळजी करु नका.’ आता चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं असून अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का ? असा सवाल निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- ‘शरद पवारांचे नाव घ्यायची तुमची लायकी आहे का?’, मुश्रीफांचा सोमय्यांना संतप्त सवाल
- जे चाललंय ते भयानक; फडणवीसांचे राज्य सरकारवर ताशेरे
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ


