मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार; अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा
- सिंधुताईंच्या मदर ग्लोबल फाउंडेशनला मिळणार सामाजिक न्यायच्या अनुदानित वसतिगृहाची साथ
- बांधकाम प्रकल्पांना प्रिमियमच्या निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही : देवेंद्र फडणवीस
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
