🕒 1 min read
बीड : केंद्र शासनाच्या कुचकामी धोरणांमुळे राज्यात इंधनाची दरवाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या प्रचंड दरवाढीमुळे सामान्य नागरिक अडचणीत आला आहे. इंधन दरवाढीविरोधात आता राज्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून केंद्र शासनाच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.
राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १११ रुपये लिटर झाले असून डिझेलनही शंभरी पार केली आहे. स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरनेही एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आधीच कोरोनातील लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. केंद्राच्या धाेरणामुळे इंधन दरवाढ झाली असून इंधन वाढल्यामुळे महागाईही वाढत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. महागाईने सामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
केंद्र शासनाच्या धोरणामुळे देशातील महागाई वाढत आहे. याच धाेरणाचा व मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (२० ऑक्टोबर) राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. ‘अबकी बार, महंगाई पे वार’ असे म्हणत हे आंदोलन होणार आहे. युवकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
