पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज(१५ नोव्हें.)पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
दरम्यान, रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतातच’
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल


