टीम महाराष्ट्र देशा: देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता लोक पेट्रोल डिझेल टाळण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा पर्याय लोकांना एक सर्वोत्तम मार्ग वाटत आहे. कारण इलेक्ट्रिक वाहने लोकांना अनेक फायदे देत आहे. ही परिस्थिती पाहता रॉयल एनफिल्ड ने इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये प्रवेश केला आहे. रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) ने आपल्या इलेक्ट्रिक बाईक (Bike) ची चाचणी देखील सुरू केली आहे. शिवाय केटीएम (KTM) ने देखील त्यांच्या इलेक्ट्रिक बाईक ची घोषणा केली आहे.
रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक (Royal Enfield Electric Bike)
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाईक सादर करू शकते. सध्या कंपनीचे सर्वाधिक लक्ष इलेक्ट्रिक बाईकचा बेस तयार करण्यामध्ये आहे. त्याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक बाईक बेस्ट पावर आणि रेंज सोबत प्रस्तुत करणार आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईक मध्ये सर्वोत्तम बॅटरी क्षमता असल्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, रॉयल एनफिल्ड आपल्या इलेक्ट्रॉनिक बाईक 3 व्हेरियंट मध्ये लाँच करू शकते. यामध्ये Meteor 350, Classic 350 आणि Hunter 350 यांचा समावेश असू शकतो. कंपनी या 3 व्हेरीयंटच्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.
काही दिवसांपूर्वी रॉयल एनफिल्डचे Royal Enfield Meteor 350 हे व्हेरियंट डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसले होते. परंतु याबद्दल कंपनीकडून अजूनही कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील पाच वर्षात कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.
आगामी इलेक्ट्रिक बाईक
भारतामध्ये सध्या दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक वाहन निर्माता कंपनी आपले इलेक्ट्रिक व्हेरियंट बाजारामध्ये आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज देखील आपली इलेक्ट्रिक बाइक लवकरच लाँच करण्याची तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाज आपल्या स्पोर्ट बाईक केटीएम (KTM) चे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये आणू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का?, राज ठाकरे म्हणाले…
- Nana Patole | “खोके घेतल्याचं आमदारच मान्य करतात, त्यामुळे माफीने वस्तुस्थिती बदलणार नाही”
- Volvo EX90 Launch | Volvo ची इलेक्ट्रिक SUV EX90 ‘या’ दिवशी होऊ शकते लाँच
- Virat Kohli । हॉटेल रूमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीची बीसीसीआयकडे तक्रार
- Morbi Bridge | मोरबी पूल पडला की पाडला?, तरुणांची मस्ती अनेकांच्या जीवावर बेतली, पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

