अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं.
इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या.
Can’t be a better opening combo on the eye than @imVkohli & @ImRo45 !!! Could easily match @virendersehwag & @sachin_rt if they stick with this combo … #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 20, 2021
या मॅचमध्ये विराट रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला. यानंतर या दोघांनी 9 ओव्हरमध्येच 94 रन केले. विराट 80 रनवर नाबाद राहिला तर रोहितने 64 रन केले. विराट कोहलीच्या या निर्णयाचं त्याच्या टीकाकारांनीही कौतुक केलं. मागच्या दोन महिन्यांमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक डझन पेक्षा जास्त ट्वीट केली, यामध्ये विराटला लक्ष्य करण्यात आलं. पण यावेळी मात्र मायकल वॉनने विराटचं कौतुक केलं. ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापेक्षा उत्कृष्ट ओपनिंग जोडी सध्या तरी नाहीये. ही जोडी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखीच आहे, पण त्यांनी पुढेही ही जोडी कायम ठेवावी,’ असं ट्वीट मायकल वॉनने केलं.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे


