🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चा ‘ग्लोबल टिचर अॅवॉर्ड’ मिळल्यानंतर त्यांचे देशभरात आणि परदेशातही त्यांचे कौतुक झाले. मागील वर्षापासून कोरोनानाचे संकट असल्यामुळे हे सर्व ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात आले. यामुळे डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. परंतु आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच मिळाली आहे.
डिसले गुरुजींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रॉफीसोबतच फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. हीच ती जीची मी वाट पाहत होतो, असे कॅप्शन डिसले गुरुजींना या फोटोला दिले आहे. या फोटोत ते ट्रॉफीला कीस करताना दिसत आहेत.
Here it is , @TeacherPrize ????
Much awaited
हीच ती ???? pic.twitter.com/kJhjlLkUq0— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) May 11, 2021
माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटी प्रयोगशाळा उभारली आहे. कल्पकता आणि संशोधनात्म वृत्तीच्या जोरावर त्यांनी ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळवला आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच ७ कोटींपैकी अर्धी रक्कम ९ देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. त्यानंतर आता ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ‘कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार आहेत. विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- ‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी
- ख्रिस भाऊ घेतोय जगातील सर्वात मोठ्या बर्गरचा आस्वाद ; पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

