Share

केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ- यशोमती ठाकूर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज उत्तर प्रदेश निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे आज विविध पक्षातील नेत्यांनी मतदारांना आपल्यालाच मत देण्याचे आवाहन केले आहे. तर १० मार्च नंतर उमेदवारांचे भविष्य कळेल. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसने एक मुद्दा लावून धरला आहे. तो म्हणजे निवडणूक संपताच पेट्रोल-डीजेलच्या किमती वाढणार. आता यावरच राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही मतदारांना आवाहन केले आहे.

“मतदान संपताच जर उद्यापासून इंधनाच्या किंमती वाढल्या तर लक्षात घ्या. केंद्रातलं सरकार बदलण्याची हीच योग्य वेळ आहे.”, असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे. यापूर्वी पेट्रोल-डीजेलच्या किंमतीवरूनच राष्ट्र्वादीचे नेते रोहित पवार( Rohit Pawar) यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

पाच राज्यातील निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ती ७ तारखेला मतदान होताच होईल की निकालानंतर हे बघावं लागेल. असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता. तसेच लोकांना दिलासा देण्याची सरकारची जर इच्छा असेल तर एक्साईज ड्युटी कायम ठेवून सेस कमी करावा.जेणेकरुन त्याचा फटका राज्यांना बसणार नाही. असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!