Share

”हा’ तर राहुल द्रविडच्या संगतीचा परिणाम’ ; कृणाल पंड्याने मैदानातील कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. या एकदिवशीय सामन्यात कृणाल पंड्याने शानदार गोलंदाजी केली. मात्र यावेळी गोलंदाजीशिवाय कृणालने त्याच्या खिलाडू वृत्तीसाकडे सर्वांचे लक्ष वेधले.

झाले असे की, श्रीलंकेच्या डावाच्या 22 व्या ओव्हरमध्ये धनंजय डी सिल्वाने खेळलेला शॉट अडवण्यासाठी पांड्याने झेप घेतली. यादरम्यान त्याचा धक्का नॉन स्ट्राइकला असलेल्या चरिथ असलंकाला लागला. त्यानंतर कृणालने लागेचच खेळाडूवृत्ती दाखवत असलंका याला मिठी मारली. त्याच्या याच कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आणि अनेकांनी कौतुक देखील केले. कृणालचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच कृणालमध्ये झालेल्या या बदलाचे श्रेय नेटकऱ्यांनी राहुल द्रविडला दिले आहे.

राहुल द्रविडमुळेच कृणालच्या वागण्यात बदल झाला आहे असे अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. क्रुणाल मैदानावर खूप आक्रमक असतो पण या सामन्यात त्याची बदललेली शैली पाहून अनेकजण चकित झाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!