🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसर्या लाटेने मागील दीड महिन्यात शहरात चांगलेच थैमान घातले होते. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून रोज नव्याने आढळणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पूर्वी हजारच्या घरांत असणारी रोजची रुग्णांची संख्या ही आता तिनशे ते चारशेवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे कोरोनातून बरे होणार्या रुग्णांचे प्रमाणही ९४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामुळे शहरवासीयांसह आरोग्य यंत्रणेला सुखद दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिन्यात तर कोरोनाचा उद्र्ेक झाला. रोजची सुमारे नऊशे ते हजार बाधितांची संख्या निघू लागल्याने चिंता वाढली होती. कोरोनाच्या या दुसर्या लाटेत मृत्युदरही अधिक दिसून आल्याने बरे होण्याचे प्रमाण अर्थातच रिकव्हरी रेट हा तब्बल ७९ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने मृत्युदर उंचावला होता.
दरम्यान, रोज गतीने वाढत जाणार्या रुग्णसंख्येमुळे शहरात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील बेड्सही रुग्णांनी हाऊसफुल झाले होते. परिणामी, नव्याने आढळणार्या अनेक रुग्णांना बेड्ससाठी शोधाशोध करावी लागून परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मात्र प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे महिनाभरात वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे.
साधारणतः २१ एप्रिलपासून शहरात रोज नव्याने आढळणार्या रूग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. दुसरीकडे गत महिन्यात ७९ टक्क्यांपर्यंत खालावलेला रिकव्हरी रेटही आता वाढला आहे. गुरुवारी ( दि. ६) शहराचा रिकव्हरी रेट ९४.७६ टक्के एवढा नोंदला गेला. ही बाब शहराला दिलासा देणारी मानली जात असून आरोग्य यंत्रणेवरील ताणही यामुळे कमी झाला आहे. तसेच एकुण पॉझिटीव्हीटी रेटही कमी झाला आहे. हा रेट ९.७९ इतका झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता पंढरपूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल ; संजय काकडेंचा विश्वास
- Breaking : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांचे कुटुंबीय उघड्यावर, शासनाने मदत करावी शिक्षक समितीची मागणी!
- उच्च न्यायालयाने सांगितलं पुण्यात पूर्ण लॉकडाऊन करा, आता पुण्याचे महापौर म्हणतात…
- एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्रिपदी विराजमान; सर्व रेशनकार्डधारकांना मिळणार 2 हजारांची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
