🕒 1 min read
दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
यानंतर, नैतिकता लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपने विविध प्रकरणांवरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी गेले काही महिने अक्षरशः रान उठवले होते. आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विविध नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील या प्रकरणी भाष्य करून बोचरी टीका केली आहे. ‘भारतात प्रथमच पोलिसांनीच बॉम्ब पेरल्याचे आणि गृहमंत्र्यांनी वसुली मागितल्याचे आम्ही पाहतोय,’ अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
#AnilDeshmukh 's resignation exposes Udhav Thackeray government to the hilt.
It is first time that we have seen police planting bombs and Home Minister asking for "Vasooli" in India.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 5, 2021
‘वाझेला उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री आता राजीनामा का देत नाहीत ?’
‘निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?’ असा सवाल नारायण राणे यांनी केला असून एकप्रकारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार
- मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा
- गृहमंत्र्यांचा राजीनामा ! आता कोण होणार महाराष्ट्राचा नवा गृहमंत्री ?
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
