🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी काही नेत्यांसोब काँग्रेस पक्षाचे मुख्य ट्विटर अकाऊंटवर देखील ट्विटरने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावर मराठी अभिनेता आरोह वेलणकर याने ट्विट करत काँग्रेसला डिवचलं आहे. ‘काँग्रेसचा ट्विटर सोबतच हा छोटासा संघर्ष मनोरंजन करणारा आहे. मराठीत याला लुटु पुटुची लढाई असं म्हणतात,’ असा टोला वेलणकर याने ट्विटरवरुन लगावला आहे.
This little struggle @INCIndia is having with @Twitter is entertaining, In marathi we call it “ लुटु पुटुची लढाई “ ???? gn.
— Aroh Welankar (@ArohWelankar) August 12, 2021
आता भाई जगताप यांचे अकाऊंट देखील झाले निलंबित
काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या नेत्यांचेही ट्वीटर हँडल ट्वीटरकडून निलंबित करण्यात आले आहे. भाई जगताप यांनीही राहुल गांधी यांना आपला पाठींबा दर्शवला होता. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या आणखी ५ वरिष्ठ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रातील या नेत्यांशिवाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या अकाऊंटवर ट्विटरने कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी संजय राठोड अद्यापही मोकाट कसा?’, चित्रा वाघ यांचा सवाल
- राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाई जगताप यांचेही खाते ट्विटरकडून निलंबित
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
