Share

‘पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी संजय राठोड अद्यापही मोकाट कसा?’, चित्रा वाघ यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परळीतील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवसेना आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचं दिसत आहे. पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात धक्कादायक आरोप केला जात आहे. संजय राठोड यांच्याविरोधात शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका महिलेने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत माझा लैंगिक छळ करतात असं ही त्यात म्हटलं आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यासंदर्भात गुरुवारी एक पोस्ट केली होती.

त्यानंतर आज शुक्रवारी चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या संजय राठोड वर आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहतोय?’ असा सवाल वाघ यांनी विचारला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तालिबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती, जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय. मला मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्याच करावी लागेल का? तिला जीवचं द्यावा लागणार आहे का ? आज मी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनींना आवाहन करते की रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवा. जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल,’ असे चित्रा वाघ म्हणाल्या.

काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि राठोडांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर राज्य सरकारला राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट सोशल मीडियावर याबाबत जाब विचारला आहे. यवतमाळमधील महिलेने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांना याबाबत तक्रार करण्यात आलीये. मात्र, तरीही पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!