Share

हे खरंच सरकार नाही ‘सर्कस’ आहे, नितेश राणेंनी डागली ‘ठाकरे सरकार’वर तोफ

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता राजकीय वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवत राष्ट्रवादीला ठाकरी हिसका दाखवला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

चिंताजनक : रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानावर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यात परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.

मोठी बातमी : देशात २०२१ पर्यंत कोरोनाची लस येणे शक्यच नाही

महाविकास आघाडीतील या मतभेदावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी चांगलच तोंडसुख घेतल आहे. ‘नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई? हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे,’ असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आता यावर महाविकास आघाडीतील नेते काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!