🕒 1 min read
मुंबई : कोविड १९ वर एकूण ११ प्रायोगिक लशींवर सध्या जगात चाचण्या सुरू आहेत. त्यात भारतातील कोव्हॅक्सीन व झायकोव्ह डी या लशींचा समावेश आहे. पण, यातील कुठलीही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे.
आयसीएमआरने (भारतीय वैद्यक संशोधन परिषद) मात्र शुक्रवारी असे म्हटले होते की, पंधरा ऑगस्ट रोजी करोनावरची स्वदेशी लस जारी केली जाईल. आयसीएमआरच्या त्या घोषणेवर टीकेची झोड उठल्यानंतर लशीच्या चाचण्यांत स्वयंसेवक ठरवणे व इतर प्रक्रियातील लालफितीचा कारभार टाळण्यासाठी रुग्णालये, कंपन्या व इतर संबंधित घटकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती, असे स्पष्टीकरण या संस्थेने केले होते. असे असले तरी पंधरा ऑगस्टला स्वदेशी लस आणली जाईल या घोषणेवर त्यांनी स्पष्टपणे माघार घेतली नव्हती, पण रविवारी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र अशी लस निदान या वर्षी तरी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांना विरोधकांवर राजकीय मात करण्याकरिता पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधून करोना लस जारी करता यावी यासाठी हा खटाटोप असल्याची टीका वैद्यकीय तज्ज्ञांनी केली होती. बिहारमध्ये यावर्षी निवडणुका आहेत त्यामुळेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली होती. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत असा इशारा दिला की, वैद्यकीय चाचण्या घाईने करून अशी लस आल्यास त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
जगभरात १४० लसी आहेत ज्या मानवी चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत. यामध्ये भारतातील ११ लसींचा समावेश आहे. भारतातील कोवेव्सिन आणि ZyCov-D या दोन लसींची मानवी चाचणी सुरू करण्यात येत आहे. यावर विज्ञान मंत्रालयाने म्हटलं होतं की, यामधील कोणतीही लस ही २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता कमी आहे. या विधानाला काही काळातच हटवण्यात आलं. आयसीएमआरने सुरूवातीला १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस भारतात उपलब्ध करण्याची माहिती दिली होती. मात्र यानंतर हे विधान तातडीने बदलण्यात आलं.
अंतर्गत भांडणात संजय राऊत यांना सरकार पडण्याची भीती वाटते – चंद्रकांत पाटील
आयसीएमआरने शनिवारी म्हटलं होतं की, या वैश्विक महामारीवर जलद लस शोधण्याचं काम केलं जात आहे. याकरता दिलेल्या सर्व नियमांच काटेकोरपणे पालन केलं जात आहे. आयसीएमआरचे डॉ. बलराव भार्गव यांनी म्हटलं की, भारताने बायोटेकसोबत केलेल्या करारानुसार विकसित केलेल्या ‘कोवेक्सिन’ करता मनुष्य चाचणीला परवानगी लवकरात लवकर देण्यास सांगितले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, एकूण सहा भारतीय कंपन्या कोविड १९ लशीवर काम करीत आहेत. त्यात कोव्हॅक्सीन व झायकोव्ह -डी या दोन लशी जवळपास तयार आहेत. जगात एकूण १४० लस घटकांपैकी ११ लशी मानवी चाचण्यांच्या पातळीवर आहेत. यापैकी कुठलीच लस २०२१ च्या आधी येण्याची शक्यता नाही.
अजितदादांनी सेनेच्या ‘त्या’ नगरसेवकांना खूप समजावले पण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
