नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची सातत्याने वाढ होत आहे. जगभरात सर्वाधिक संक्रमित झालेल्या रूग्णांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रशियाला मागे टाकत कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अमेरिका आणि ब्राझील अजूनही कोरोना रूग्णांच्या संख्येत भारतापेक्षा पुढे आहेत. तर पाकिस्तान १२ व्या क्रमांकावर आहे.
वर्ल्डमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात कोरोनाचे ६ लाख ९७ हजार ८३६ रुग्ण आहेत, तर रशियामध्ये आतापर्यंत ६ लाख ८१ हजार २५१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मोठी बातमी : देशात २०२१ पर्यंत कोरोनाची लस येणे शक्यच नाही
दरम्यान भारतात ६ लाख ९७ हजारांहून अधिक रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यापैकी ४ लाख २४ हजार ८९१ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. तर १९ हजार ७०० रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रूग्णांची तुलाना रशिया देशाशी केली असता रशियामध्ये सध्या एकूण ६ लाख ८१ हजार २५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी ४ लाख ५० हजार ७५० रूग्ण बरे झाले आहे तर १० हजारांहून अधिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सध्या अमेरिका २,८४४१,१२४ रुग्णसंख्येसह पहिल्या स्थानावर असून, ब्राझील १,५७७,००४ रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलमधील करोना बाधिताच्या रुग्णसंख्येत व भारतातील रुग्णसंख्ये मोठं अंतर असलं, तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना बाधिता रुग्ण आढळून येण्याच प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. जून महिन्याच्या अखेरच्या १२ दिवसातच देशात २ लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आकडेवारीनं भारताच्या चिंतेत भर टाकली आहे.
अंतर्गत भांडणात संजय राऊत यांना सरकार पडण्याची भीती वाटते – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

