मुंबई: क्रूझ ड्रग प्रकरणातील आरोपी आर्यन खान प्रकरणातील समीर वानखेडे यांना तपास कार्यातून काढून टाकण्यात आले आहे. आता यावरच राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत वानखेडे यांना इशारा दिला आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत इशारा दिला आहे.
आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अजून एकूण २६ प्रकरणे तपासण्याची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू.असे ट्वीट मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
Sameer Wankhede removed from 5 cases including the Aryan Khan case.
There are 26 cases in all that need to be probed.
This is just the beginning… a lot more has to be done to clean this system and we will do it.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 5, 2021
दरम्यान, समीर वानखेडे यांना या प्रकरणावरून काढल्यानतंर त्यांची दिल्लीला बदली करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर एनसीबीकडून त्यांची चौकशी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचा या प्रकरणातील पुढचा तपास कसा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री माझ्या कानात एक वाक्य बोलले तेव्हाच ठरवलं आता भांडाफोड करायचाच’
- अनिल देशमुखांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज करणार; वकिलांनी दिली माहिती
- कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ
- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’

