Share

याला म्हणतात राजकारण, रात्री सभेतून टीका, सकाळी शिंदे आणि आंबेडकरांचा सोबत नाश्ता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे, तर कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे देखील जाहीर सभेतून आंबेडकर यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. दोन्ही नेते निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने असले तरी आज सकाळी सोलापूरकरांना लोकशाहीतील सुदृढ राजकारण पहायला मिळाले आहे.

आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरमधील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये अचानक भेट झाली, यावेळी दोन्ही नेत्यांनी सोबत नाश्ता देखील केला आहे. जाहीर सभेतून एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या दोन्ही उमेदवारांच्या खिलाडूवृत्तीमुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये आंबेडकर यांच्या उम्देवारीचा फटका शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे, आंबेडकर यांनी कोणाला पाडण्यासाठी नाही, तर विजयी होण्यासाठी निवडणुकीत उतरल्याचं स्पष्ट केले आहे.

आंबेडकर, शिंदे आणि स्वामी यांच्यात सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तर १६ तारखेला राज ठाकरेंची सभा सोलापूरमध्ये होणार आहे, राज यांच्या सभेमुळे शहरातील राजकारण ढवळून निघणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=T305qed29qo

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!