🕒 1 min read
गोवा : कोरोनामुक्त असलेल्या गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने खबरदारी घेतली जात आहे. गोव्यात कोरोनाचे १८ रुग्ण सापडले आहेत. म्हणून मजुरांना घेऊन जाणारी दिल्ली-थिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस राज्यात न थांबवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. करोनाचे १८ रुग्ण सापडले यामध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे काही प्रवासी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“सध्या राज्यात कोरोनाचे १८ रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण राज्यात प्रवेश करत इतर लोकांमध्ये जाण्यापूर्वीच सापडले आहेत. “राजधानी ट्रेनने प्रवास करणारे अनेक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोव्यात या ट्रेनला थांबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून मडगाव रेल्वे स्थानकावर ही ट्रेन थांबणार नाही,” अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
#Corona : हो ! आम्ही कोरोनाचे पुरावे नष्ट केले, चीनने अखेर केले कबूल
“निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील एकही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याचं समोर आलं आहे. सोबतच मडगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्याही फार कमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून रेड झोनमधून येणाऱ्या सर्व ट्रक चालकांची तपासणी केला जाणार असल्याचं प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.
२१ मे रोजी होणारी दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता प्रमोद सावंत फेटाळून लावली आहे.
फायनली CM ठाकरे आमदार झाले, आज दुपारी घेणार शपथ
चिंता वाढली ! एकाच दिवसात देशात ५ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
