नवी दिल्ली : देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अशातचं रविवारी देशात एकाच दिवसात ५ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी नोंद आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९६ हजार १६९ वर गेली आहे. तर त्यापैकी ३६ हजार ८२३ हे रिकव्हर झाले आहेत. तर आतापर्यंत ३०२९ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी करोना व्हायरसमुळे १५४ जणांचा मृत्यू झाला. करोनामुळे एकाचदिवशी झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
दरम्यान राज्यात दिवसभरात २३४७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ०५३ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात ६३ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११९८ वर पोहोचली आहे. राज्यात आज नवीन ६०० रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ७६८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात एकूण २४ हजार १६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नाही
घाऊक भाजी विक्रीसाठी १९ मे पासून कॉटन मार्केट सुरू होणार- तुकाराम मुंढे
#corona : सरपंच, ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसुर केल्यास होणार कडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

