मुंबई : मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (school reopening in Mumbai) आजपासून सुरु होण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने तसा निर्णय जाहीर केला असून महानगरपालिका संभ्रमात असल्याचे दिसून आले. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. खंडणी आणि टक्केवारी सोडून बाकी प्रत्येक गोष्टीत या सरकारला संभ्रम आहे, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मात्र शिक्षक आणि पालकांच्या मनात अद्यापही संभ्रमांचे वातावरण आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरातील पालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबत नकार दाखवला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या सावटामुळे शाळा सुरू करण्याबाबत कमालीचा संभ्रम दिसून येत आहे.
खंडणी आणि टक्केवारी सोडून बाकी प्रत्येक गोष्टीत या सरकारला संभ्रम आहे… pic.twitter.com/eCloXWLBRO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 14, 2021
मुंबईत शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्यात बैठकी होत आहेत. पालक संघटनांशी चर्चा करुन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ असा पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. आजपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याच्या सुचना अद्याप मिळाल्या नाहीत. त्यामुळे शाळा सुरु करण्याची तयारी अद्याप केलेली नसल्याचे शिक्षक सांगत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला


