🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून 8 बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे.
फरार मंत्र्यांचं सरकार, हप्ते वसूली करणारं सरकार, दररोज बलात्काराने स्तब्ध होत आहे. महिलांवर अत्याचार करण्याचं लायसन्स देणारं सरकार कुछ तो शर्म करो असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.
भगौडे मंत्रीयों की..
हफ्ता वसूली करती सरकारहर दिन बलात्कार से दहल उठी
महिलाओं पर अत्याचार करने का
लायसन्स देनेवाली सरकारकिसानों को राहत देने बजाए दुश्मन बनी सरकार
हर मोर्चे पर फेल हुई #MVA सरकार
किसानों के नामपर रोटीयां सेंक रही सरकार
कुछ तो शर्म करो!#NoMaharashtraBandh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 11, 2021
भगौडे मंत्रीयों की..
हफ्ता वसूली करती सरकारहर दिन बलात्कार से दहल उठी
महिलाओं पर अत्याचार करने का
लायसन्स देनेवाली सरकारकिसानों को राहत देने बजाए दुश्मन बनी सरकार
हर मोर्चे पर फेल हुई #MVA सरकार
किसानों के नामपर रोटीयां सेंक रही सरकार
कुछ तो शर्म करो!#NoMaharashtraBandh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 11, 2021
हे राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करुन दिलासा देण्याऐवजी त्यांचे दुश्मन बनलं आहे. महाविकास आघाडी सरकार प्रत्येक मोर्चांवर अयशस्वी ठरलं आहे. शेतकऱ्यांच्या नावाने आपल्या पोळ्या भाजून घेणारं सरकार, कुछ तो शर्म करो, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. सोबतच त्यांनी या बंदला विरोध करत #NoMaharashtraBandh असा हॅशटॅग वापरला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लखीमपूर हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटले आहेत. शेतकरी वर्गातून या हिंसाचाराचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- भारतात आजसारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते- पंतप्रधान मोदी
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
