🕒 1 min read
नवी-दिल्ली : सोमवारी(१० ऑक्टो.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन स्पेस असोसिएशनचे व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की,’जिथे गरज नाही तिथे सरकार नियंत्रण संपवणार आहे. तसेच भारतात आजसारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते. अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात आज भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत, त्याचा दुवा आहे. भारतीय स्पेस असोसिएशनच्या स्थापनेसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.’
Our approach to Space reforms is based on four pillars — freedom to private sector in innovation, role of Govt as an enabler, to make youth future-ready, & to see the Space sector as a resource for the progress of common man: PM Modi at the launch of Indian Space Association pic.twitter.com/59YsJKjzIv
— ANI (@ANI) October 11, 2021
यावेळी बोलत असतांना मोदी म्हणाले की,’जेव्हा आपण अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा आमचा दृष्टिकोन चार खांबांवर आधारित असतो. प्रथम, खाजगी क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण स्वातंत्र्य, दुसरे, सक्षम करणारे म्हणून सरकारची भूमिका, तिसरे, तरुणांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे, अवकाश क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणे. १३० कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी आपले अंतराळ क्षेत्र हे एक मोठे माध्यम आहे. आपल्यासाठी अंतराळ क्षेत्र म्हणजे, सामान्य माणसासाठी सुधारित मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी, उद्योजकांसाठी शिपमेंटपासून डिलिव्हरीपर्यंत चांगली गती.’
दरम्यान, ‘भारताला नवनिर्मितीचे नवीन केंद्र बनवावे लागेल. भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे एंड टू एंड टेक्नॉलॉजी आहे. आम्ही कार्यक्षमतेला ब्रँडचा अविभाज्य भाग बनवले आहे. मग ती अंतराळ संशोधनाची प्रक्रिया असो किंवा अवकाशाचे तंत्रज्ञान. आपल्याला ते सतत शोधायचे आहे’ असेही यावेळी मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
