🕒 1 min read
मुंबई: आज (२५ फेब्रुवारी)मुंबईत भाजपची कोअर कमिटी बैठक सुरु असून या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित आहेत. यावेळी भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत ‘महामेरू’ सरकार म्हटले आहे.
शेलार म्हणाले की, “शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल, आदिवासी आश्रमशाळांना कशी मदत करता येईल, शहरांचा विकास कसा करता येईल. १२ बलुतेदारांना रोजगार कसा देता येईल. कोरोना काळात दुर्दैवाने जे मृत्युमूखी पडले त्यांच्या परिवारांना मदत कशी मिळेल. या सर्व प्रश्नांकडे ठाकरे सरकार कानाडोळा किंवा डोळे बंद करून बसलेलं आहे. केवळ एकाच गोष्टीवर हे महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे. ते म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद.याच्या समर्थनार्थ पूर्ण वेळ सरकार काम करत आहे. म्हणून या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरुपाचं करावं लागेल, एवढी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची झाली आहे.” असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच “सज्जन का जीवन निर्भय हो, व्यक्ती व्यक्ती ये कहे गर्व से मुझमे मेरा धर्म बचा हे”, असे म्हणत भाजपची लढाईची सुरुवात झाली असून या लढाईत जनता, गरीब माणूस जिंकेल. भ्रष्ट व्यवस्था पराभूत होईल, आतंकवाद पराभूत होईल. सामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे. असे उद्गार आशिष शेलार यांनी काढले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘ईडीची चौकशी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच का ?’ अंबादास दानवेंचा सवाल
…अशा धाडींमुळे काही लोकांना आसुरी आनंद होतोय- किशोरी पेडणेकर
“तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात अन् पाप करतात, त्यामुळे…” संजय राऊतांचा विरोधकांना खोचक टोला


