टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तार झाला. तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र अनेक अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नमिळाल्याने महाविकास आघाडीत अनेक नेते नाराज होते. अशातच आता शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून आता विरोधाकंनी महाविकास आघाडी सरकारला घेरायला सुरवात केली आहे.
मराठवाड्यातुन शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले त्याच मराठवाड्यातील 120 शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आत्महत्या केल्या. मात्र अब्दुल सत्तारनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही म्हणून राजीनामा दिला. या सरकारने बंगले, मंत्रीपद आणि सत्ता यात मग्न राहून महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडलय. अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
मराठवाड्यातुन शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले त्याच मराठवाड्यातील 120 शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आत्महत्या केल्या. मात्र अब्दुल सत्तारनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही म्हणून राजीनामा दिला. या सरकारने बंगले, मंत्रपद आणि सत्ता यात मग्न राहून महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडलय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 4, 2020
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाष्य केलं आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते वाशिम येथे कार्यकर्ता मेळावा व सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारच्या पतनाची ही सुरुवात आहे. मलईदार खात्यांसाठी सत्तेला विसरले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस मिळून तयार झालेलं सरकार विश्वासघातने तयार झालं आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

