Share

Pankaja Munde : हा निर्णय अनपेक्षित नव्हता, सर्व भाजपा नेत्यांचा निर्णय – पंकजा मुंडे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीमध्ये भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली असून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथ घेणार आहेत.  यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषानेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडल्याच चित्र दिसत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांचे समर्थक जल्लोष करताना दिसत आहेत तर दुसरीकडे भाजपने शिवसैनिकाला संधी  देऊन शिवसेनेची गोची केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकज मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय अनपेक्षित नसल्याच  त्या यावेळी म्हणाल्या.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सर्व भाजपा नेत्यांनी मिळून घेतला, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपचे मंत्री त्यांच्यासोबत काम करतील, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. पक्षातील कार्यकर्तेही शिस्तबद्ध असल्याने हा निर्णय मान्य करतील, असे त्यांनी सांगितले

२०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. जनतेने महाविकासआघाडीला मत दिले नव्हते. शिवसेना भाजप युतीला दिले होते. महाविकास आघाडीच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला. दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणं हे खूप खेदजनक आहे. एकीकडे बाळासाहेबांनी दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो.

महत्वाच्या बातम्या :

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!