मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना जोरदार रंगला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यावरुनही भाजपने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हा प्रश्नसत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरं आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असं सांगितलं. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत राऊतांना सुनावलं आहे.
झूठ…,ही लढाई ड्रग्ज माफिया, त्यांच्या पेरोलवर असलेल्या महाष्ट्रातील राजकारणी आणि एनसीबी यांच्यामध्ये सुरु असल्याचं सांगितलं आहे.
झूठ…
ही लढाई ड्रग्ज माफिया, त्यांच्या पे रोलवर असलेले महाराष्ट्रातील राजकारणी आणि NCB यांच्यामध्ये सुरू आहे. https://t.co/rlJijeSlvm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 29, 2021
क्रांती रेडकरांचा काय संबंध आहे? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केलीय असं माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- नवविवाहित आयुषी आणि सुयश टिळक यांच्या देवदर्शनाची जोरदार चर्चा
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

