🕒 1 min read
अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात पृथ्वी शॉने केलेल्या एका कृतीमुळे सामन्यादरम्यान सचिनची आठवण झाली. आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शिखर धवन आणि पृथ्वी ही जोडी मैदानावर उतरली होती. परंतु तिसऱ्या षटकातच धवन बाद झाला, तर आठव्या षटकात पृथ्वी एक खराब फटका खेळून तो बाद झाला. हर्षल पटेलच्या षटकातील दुसरा चेंडू पृथ्वीच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक डिविलियर्सच्या हातात जाऊन विसावला. आरसीबी संघाने यावर अपील केले मात्र पंचाने काहीच निर्णय दिला नाही. मात्र पृथ्वी शॉने पंचाच्या निर्णयाची वाट न बघता क्रिझ सोडली आणि पव्हेलियनच्या दिशेने चालु लागला.
https://twitter.com/lodulalit001/status/1387094403752239106
https://twitter.com/droopyaxe1/status/1387084607372152834
पृथ्वीच्या याच कृतीने प्रेक्षकांना सचिनची आठवण झाली. कारण अनेकदा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा त्याच्या कारकिर्दीदरम्यान बाद झाल्यानंतर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्वत:च मैदान सोडायचा. हीच कृती पृथ्वी शॉने केली त्यामुळे अनेक क्रिकेट रसीकांना पृथ्वीमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सचिनची झलक पाहायला मिळाली. क्रिकेटरसिकांनी ट्विटरवर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पृथ्वीने या सामन्यात १८ चेंडूंत ३ चौकारासह २१ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
- बीडमधील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा, पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र
- कोरोनाच्या भीषण परिस्थितीत भारताच्या मदतीला ‘हे’ देश आले धावून; जगभरातून सुरु झाला मदतीचा ओघ
- आसामसह भारताच्या पूर्वेकडील भागाला भूकंपाचे झटके, धक्याची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल
- युवकाची हत्या करत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
- ….आणि विराट कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
