औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील दरोड्याचा तपास अद्याप गुलदस्त्यात असताना याच गावातील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी पोलीसांना चांगलेच आव्हान दिले आहे.
दि.२ जुलै रोजी रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी खंबाळा येथे शेत वस्तीवर पती पत्नीला लाकडाने व धारदार शस्त्राने मारहाण केली होती. यात राजेंद्र गोरसे या युवकाचा मृत्यू झाला होता. तर त्याची पत्नी मोनिका ही गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे परिसराबरोबरच पोलीस दलातही खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. पोलीसांनी दोन दिवसानंतर दोन संशयितांना अटक केली होती. मात्र त्यांची नावेही अद्याप पोलीसांनी उघड केली नाही. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यांच्याकडून काही माहिती मिळाल्याचेहि पोलीसांनी जाहीर केले नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दरोड्याचा तपास अद्याप गुलदस्त्यात आहे. अटक केलेल्या दोन संशयतीचा घटनेशी काही संबंध होता की नाही हे अद्याप उघड झाले नाही. त्यातच खंबाळा गावात चोरट्यांनी विजय गोरसे यांचे किराणा दुकान फोडून चोरी केले. या चोरीचा गुन्हा मात्र पोलिस ठाण्यात दाखल झाला नाही. मात्र चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले आहे. तर खंबाळा येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किरतपूर येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास चोर समजून ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाच्या कामावरील मजूरांना जबर मारहाण केली. त्यामुळे या भागात अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं’; ज्येष्ठ अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे
- ‘अजूनही निकालाचे सर्व्हर डाऊनच ; ठाकरे सरकार नाकर्ते असल्याचे पुन्हा सिद्ध झाले’
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेनं…’
- काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्व तयार होऊ द्यायचेच नाही – भाजपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

