Share

‘ते काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात’; जयंत पाटलांचा पलटवार

Published On: 

सांगली : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. ‘जातीचा मुद्दा त्या त्या जातीतील नेत्यांना मोठं करण्यासाठी पुढे केला जातो. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला’ असं राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

आता राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील.’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं ?

‘महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!