🕒 1 min read
औरंगाबाद: सिल्लोड शहरातील अनेक गावांमध्ये आत्तापर्यंत वीज पुरवठा नव्हता. मात्र आता गावेच्या गावे प्रकाशमान होताना दिसून येत आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने अनेक ठिकाणी रोहित्र बसवण्याचे काम वेगाने सुरू असून ज्या गावात याआधी कधीही वीज नव्हती त्या ठिकाणी वीज आल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. सिल्लोड शहरातील टिळकनगर, रजाळवाडी, सपकाळ वाडी परिसरात नव्याने बसविण्यात आलेल्या रोहित्राचे लोकार्पण युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते शनिवार ( दि. १४) संपन्न झाले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरासह मतदार संघ प्रकाशमय करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती युवानेते अब्दुल समीर यांनी याप्रसंगी दिली. शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्याप्रमाणे नागरी वस्त्याही वाढत आहेत.
त्यामुळे वाडी वस्त्यांपर्यंत सुरळीत वीज पुरवठा करण्याचे काम सुरू असल्याचे अब्दुल समीर म्हणाले. सपकाळ वाडी भागांत अलीकडच्या काळात नव्याने वसलेल्या वस्तीमध्ये यापूर्वी वीज व्यवस्था नव्हती, मात्र आता येथे नवीन रोहित्र बसवून सगळ्यांना वीज कनेक्शन दिले जाणार आहे. याबाबत येथील नागरिकांनी एकमेकांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा केला. युवानेते अब्दुल समीर यांनी स्वतः पेढ्याचा बॉक्स घेवून येथील राहिवाशांना पेढा भरवीत या आनंदोत्सवात सहभाग नोंदवला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल’
- तब्बल २० वर्षानंतर विंडीजचा फलंदाज झाला नव्वदीत धावबाद
- ‘भाजपने १४ ऑगस्ट साजरा करणे म्हणजे देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न करणे’-नाना पटोले
- मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात झाली चूक; भाजप आमदार म्हणाला, ‘अभ्यासू आणि ब्येष्ट’
- विनेश फोगाटने WFI ची मागितली माफी, मात्र…

