नागपूर : आयुक्तपदावरून तुकाराम मुंढेंची बदली झाली अन् महापौर संदीप जोशी यानी नव्या दमाने कामांचा प्रारंभ केला आहे. तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीमुळे कायमच आंदोलनाच्या मुडमध्ये राहणारे संदीप जोशी एक्शन मुडमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आता ‘ऑक्सीजन लेवल’ची चाचणी करण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.
शहरातील सर्वच २८ पोलिस ठाण्यात नगरसेवक आणि पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. या कार्यात विविध स्वयंसेवी संस्था सुध्दा सहभागी होणार आहेत. हा निर्णय विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ.भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींन्द्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मृत्यू संख्यासुद्धा झपाटयाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते आणि रुग्णांची प्रकृती बिघडते. म्हणून रुग्णांच्या ऑक्सीजन पातळीची तपासणी करण्यात येणार आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस कर्मचारी या मोहिमेत भाग घेणार आहेत. या मोहिमेत मनपा कर्मचारी व एन.जी.ओ.चे प्रतिनिधी पोलिसांसोबत नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहे.
नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा, वाचा काय आहे प्रकरण
महापौर संदीप जोशी यांनी मोहिमेला शुभेच्छा देताना नगरसेवकांकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे. त्यांनी सांगितले की, ऑक्सीजन लेवलची तपासणी करुन नागरिकांची प्राणहानी थांबिण्यात यश येऊ शकते. शुक्रवारपासून ही मोहिम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठया प्रमाणात उपक्रमात सहभागी होऊन कोरोनाला हददपार करण्यात प्रशासनाला मदत करावी. नगरसेवकांनी आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकदीने पूर्ण करणार- राहुल जगताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

