टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. मागील पाच वर्षापासून ते प्रदेशाध्यक्षपद सांभाळत आहेत, आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांना केंद्रात मंत्रीपद देत राज्यामध्ये नवीन चेहऱ्याला संधी देण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावांंची चर्चा आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी आज पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींन बरोबर मंत्रीमंडळातील इतर नेते मंडळी देखील शपथ घेणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

