Share

नगर महापालिकेत या पाच जणांना मिळाली स्वीकृत नगरसेवकपदाची संधी

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक असे एकूण पाच सदस्य नियुक्त केले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या नावांप्रमाणे ही यादी मंजूर झाल्यानंतर महापाैरांनी ही नावे जाहीर केली.

यात शिवसेनेकडून मदन आढाव व संग्राम शेळके, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विपुल शेटिया व डाॅ.राजेश कातोरे, तर भाजपकडून रामदास आंधळे हे स्वीकृत नगरसेवक झाल्याचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी जाहीर केले आहे.

यापूर्वीही एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती. मात्र गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बाद ठरविले होते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून तिन्ही पक्षांत हालचालींना वेग आला होता. शिवसेनेत स्विकृत नगरसेवक निवडीवरुन मागील चार दिवसांपासून रणकंद सुरू झाले होते. अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

शिवसेनेचे दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचे पूत्र असलेले माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना स्विकृत नगरसेवकपदावर संधी मिळू शकली नाही. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप गांधी यांचे पूत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनाही संधी मिळावी, असा सूर गांधी गटातून होता, तथापि, भाजपकडे एकच जागा असल्याने रामदास आंधळे यांचे पुर्वीचेच नाव निश्चित ठेवून गांधी यांनाही संधी मिळू शकली नाही.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!