मुंबई : हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
या सगळ्या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे. राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवार ती विधानं मुद्दाम करतात की, त्यांचे ते अज्ञान?’ चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- भाजपच्या सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही : थोरात
- नागपुरात आता आयव्हीपआर सिस्टीमद्वारे साधला जाणार कोरोना बाधितांशी संपर्क
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण !
- आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात,आता तरी चाचण्या वाढवा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

