🕒 1 min read
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला मिळावा मनपाने ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स’ (आय.व्हीस.आर.) सिस्टीमचा अंगीकार केला आहे. त्यानुसार आता शहरातील गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांना आय.व्हील.आर. प्रणालीद्वारे संपर्क साधण्यात येणार आहे.
यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेने ‘स्टेप वन’ कंपनी सोबत करार केला आहे. या करारानुसार नागपूर शहरातील कोरोना रुग्णांना ‘इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स’ (IVR) पध्दतीच्या माध्यमाने दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात येईल. नागपूर शहरात दररोज ५०० च्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णांना व्यक्तीगतरित्या दूरध्वनी व्दारे संपर्क करणे अवघड होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आय.व्ही.आर. सिस्टीमच्या माध्यमातून संपर्क केला जाईल. सिस्टीमद्वारे गृह विलगीकरणातील रुग्णाला फोन केला जाईल. फोन आल्यानंतर रुग्णाला फोनवर सांगण्यात येणारे नंबर दाबून आपल्या प्रकृतीची माहिती द्यावी लागेल.
आय.व्ही.आर. सिस्टीमच्या माध्यमातून रुग्णांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेउन ती खालावलेली आढल्यास त्या रुग्णाचा मोबाईल क्रमांक तज्ज्ञ डॉक्टरांना दिला जाईल. तज्ज्ञ डॉक्टर त्यांना संपर्क करुन आवश्यक सल्ला देतील. यासंबंधी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि ‘स्टेप वन’ कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून देशात अनेक शहरांमध्ये कोव्हिड रुग्णांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.
यासंदर्भात बोलताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री.जलज शर्मा यांनी सांगितले की, या सेवेचा गृह विलगीकरण मध्ये राहणा-या कोरोना रुग्णांना फायदा होईल. त्यांची प्रकृती बरी नसल्यास तज्ज्ञ डॉक्टर त्यांना वेळेत उपचार करण्यास मदत करतील.नागपुरात लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये राहण्यात अनुमति प्रदान केली आहे.
गृह विलगीकरणात राहण्यासाठी रुग्णाच्या घरी व्यवस्था नसल्यास मनपाद्वारे कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांकरीता आय.व्ही.आर. सिस्टीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सिस्टीममुळे गृह विलगीकरणातील रुग्ण स्वत:च आपल्या प्रकृतिची काळजी घेउ शकतील. त्यांना काही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.
महत्वाच्या बातम्या
- राज्यसेवा परीक्षांसंदर्भात संभाजीराजेंची महत्वाची मागणी
- पुणे जिल्हयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त
- आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात,आता तरी चाचण्या वाढवा!
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151वी जयंती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून अभिवादन
- विसरू नका निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, भुजबळांचा योगींना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
