Share

Hair Tips | ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी वापरून केस गळणे थांबू शकते, जाणून घ्या!

Published On: 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराबरोबरच आपल्या केसांवर देखील होतो. त्यामुळे अनेक लोकांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. केस गळतीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जसे की पोषक आहार न घेणे, पुरेशी झोप न मिळणे इत्यादी. पण या परिस्थितीमध्ये पुढील आयुर्वेदिक उपाय वापरून तुम्ही तुमची केस गळती थांबवू शकता.

आवळ्याचे तेल किंवा पेस्ट आहे खूप फायदेशीर

शरीरातील विटामिन सी कमी झाले की, केस गळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आवळ्यामध्ये पुरेसा प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही आवळ्याचा तेलाचा किंवा पेस्टचा हेअरमास्क वापरू शकतात. किंवा आवळ्याचे तेल केसांना लावू शकतात. यामुळे तुमची केस गळती कमी होऊ शकते.

केस गळणे कमी करण्यासाठी मेथीचे दाणे ठरतील उपयोगी

मेथीचे दाणे फक्त तुमचे केस गळणे थांबवत नाही, तर नवीन केस उगवण्यासाठी मदत करते. मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिक एसिड आणि प्रोटीन असते. त्यामुळे केस वाढीस चालना मिळते आणि नव्याने केस उगायला सुरुवात होते. तुम्ही मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट करून त्याचा हेअर मास्क लावू शकता. त्यामुळे पण तुमची केस गळती कमी होईल.

कांद्याचा रस थांबवेल केस गळती

कांद्याच्या रसामध्ये सल्फर, मॅग्नेशियम काही प्रमाणात उपलब्ध असते. तुम्ही एकदा कांद्याचा रस केसांना लावल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. कांद्याच्या रसामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे केस गळती कमी होण्याबरोबरच केसांची वाढ आणि केस दाट होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!