Share

Navneet Rana | “…तेव्हा वाटत नाही की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत” ; नवनीत राणा यांची खोचक टीका

Published On: 

नागपूर : मुंबईत 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर शिवसेना हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  त्यामुळे परंपरेनुसार असलेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देखील शिंदे गट दसरा मेळावा घेऊन शिवसेनेवर ताबा सांगणार आहेत. दरम्यान दसरा मेळाव्याच्या राजकारणावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी ऐवढा संघर्ष केला असता. तर महाराष्ट्राचा चेहरा बदलला असता. मात्र आज बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना माननारे सगळे लोक एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील आणि जबरदस्ती करुन आणलेले उद्धव ठाकरे यांच्या सभेत असतील.

धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर नवनीत राणा म्हणाल्या, “कायद्यानुसार देश चालतो. निवडणूक आयोग शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देईल. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. जेव्हा आम्ही उद्धव ठाकरे यांना ऐकतो, त्यांचे विचार ऐकतो तेव्हा वाटत नाही की ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच सगळ गमावलं आहे.”

उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरी टीका-

यापूर्वी देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरी टीका केली होती. तू ठाकरे है तो मे भी राणा हू, मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे. आमना सामना तर लवकरच होईलच, त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे, अशा शब्दांमध्ये नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला असून तुरुंगामधून निघाल्यावर त्यांना वाटलं की मी तुटून जाईल, असं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मी तुरुंगामधून बाहेर पडले तेव्हा माझ्यात जास्त ताकद आली होती. 14 दिवस, बारा-बारा तास मी तुरुंगात हनुमान चालीसाचं पठण केलं. प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट मी हनुमान चालीसा मध्ये मी पाठ करत होते. जर माझ्या भक्तीत थोडी जरी ताकद असेल तर हनुमंत राय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील. आता त्यांच्या घरात उभा राहिला एक सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, असा टोला नवनीत राणांनी ठाकरेंवर लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!